अर्जामध्ये काही बदल करायचे असल्यास आधार नंबर नंतर 01 टाकून पुन्हा अर्जं करावा
उदा. आधार नंबर (111122223333) असल्यास बदल करण्यावेळी (11112222333301) असा वापरण्यात यावा

अर्ज क्रमांक १७ द्वारे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ठ होण्यासाठी नोंदणी करणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यानी पुढील सूचना वाचून अर्ज भरण्यास सुरवात करावी.

अर्ज क्रमांक १७ ची सुरवात दि.१६ सप्टेंबर २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत आहे. इतर तपशीलासाठी विभागीय मंडळाशी संपर्क करावा.

१) आपले आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला(द्वितीय प्रत असल्यास प्रतिज्ञापत्र) अधिवास /स्थलांतर दाखला,फोटो आपल्या सोबत ठेवा.

२) SECTION 2/2 मध्ये या प्रमाणपत्रांना SCAN करून UPLOAD करावयाचे आहे.(pdf,jpg,jpeg format only, file size 256kb पेक्षा कमी असावी )

३) माहिती भरलेल्या अर्जाची PRINT काढून तो आपल्या अर्जात नमुद केलेल्या शाळेत,विहित शुल्कासह जमा करावयाचा आहे.

४) विद्यार्थ्याचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे.

५) तांत्रिक अडचणी साठी संपर्क ( ONLINE अर्ज भरण्यात काही अडचण आल्यास) 020-25705208 / 25705207 (सकाळी १०:०० ते सायंकाळी ०६:०० पर्यंत)
इतर अडचणी साठी 020-25705272 (सकाळी १०:०० ते सायंकाळी ०६:०० पर्यंत)

Click Here To Fill Application Form