महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे ४
 
निवड श्रेणीसाठी शिक्षकांच्या शैक्षणिक अर्हता, अनुभव व पात्रता
(माध्यमिक शिक्षक निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण)
शासन निर्णय क्रमांक. पीटीसी - १०९७/(३९७/९७)माशि-४, मंत्रालय विस्तार भवन,
मुंबई दिनांक २९ जून, २००२
 
१.   १२ वर्षे पूर्ण झाल्यानंतरचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.
२.   पदवीधर शिक्षकांनी पदव्युत्तर पदवीधारण करणे आवश्यक आहे.   
      उदा.     एम.ए./एम.कॉम./एम.एस्सी.,  
                 बी.एड./बी.पी.एड./एम.एड./एम.पी.एड. 
३.   प्रशिक्षित अपदवीधरांनी पदवी व पदवीधारकांनी पदव्युत्तर अर्हता प्राप्त केली असली पाहिजे.    
४.   "शिक्षकांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत इतर विषयाच्या शिक्षकांना "शिक्षकांच्या अध्यापनाच्या विषयाची पदव्युत्तर पदवी
      किंवा ज्या अध्यापनाच्या विषयाची पदव्युत्तर पदवी नियमितरीत्या संपादन करणे शक्य नसल्यास त्याठिकाणी   
      बहिस्थ:रीत्या प्राप्त केलेल्या त्या विषयातील पदव्युत्तर पदवी अथवा एम.एड. ही पदव्युत्तर पदवी ग्राह्य धरण्यात
      यावी," तसेच एम.ए.(एज्युकेशन) ही पदवी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (N.C.T.E.) च्या दिनांक २८/११/२०१४
      च्या अधिसूचनेनुसार एम.एड. पदवी समकक्ष समजण्यात यावी." 
५.   ज्या माध्यमिक शिक्षकांनी २४ वर्षानंतरची निवडश्रेणी प्राप्त करून घेतली आहे व ज्याचे वय ५५ वर्षे झाले आहे
      त्यांनी निवडश्रेणीचा फायदा घेतला असल्यास हे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.
६.   २४ वर्षे पूर्ण होण्याच्या दृष्टीने सदर शिक्षक १९९१ पूर्वी नियमित सेवेत नेमणूक झालेले असावेत.
      शासन निर्णय दिनांक १५/०६/१९९० हा कला वरिष्ठ वेतनश्रेणीच्या शिक्षकांसाठी आहे. त्यांची शैक्षणिक अर्हता
      डी.एड./ए.टी.डी./आर्ट/ए.एम. सदर प्रशिक्षण एससीईआरटी, पुणे यांचे मार्फत घेण्यात येते.