महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे ४
 
निवड श्रेणीसाठी शिक्षकांच्या शैक्षणिक अर्हता, अनुभव व पात्रता
(राज्यातील खाजगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांना निवडश्रेणीसाठी अर्हता.)
शासन निर्णय क्रमांक. एसएसएन- २६९६/ ५०७२७/(६०८/९६)/माशि-२, मंत्रालय विस्तार भवन,
मुंबई दिनांक १ डिसेंबर, १९९९
 
१.    इतर विषयाच्या शिक्षकांना शिक्षकांच्या अध्यापनाच्या विषयांची पदव्युत्तर पदवी किवा तत्सम अर्हता तसेच ज्या
       अध्यापनाच्या विषयाची पदव्युत्तर पदवी बहिस्थ:रीत्या संपादन करणे शक्य नसेल त्या ठिकाणी एम. एड. हि पदवी
       ग्राह्य धरण्यात यावी. 
२.    शारीरिक शिक्षक - एस.एस.सी. व एक वर्ष शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम प्रमाणपत्र धारकांना बी.पी.एड. ही अर्हता व
       बी.पी.एड. धारकांनी एम.पी.एड. हि अर्हता प्राप्त करावी.
३.    हिंदी शिक्षक - एस.एस.सी., एच.एस.सी. धारकांनी संबंधित विषयातील पदवी अथवा समकक्ष ही अर्हता पदवी,
       एच.एस.सी. धारकांनी संबंधित विषयातील पदव्युत्तर वा समकक्ष अर्हता धारण करावी. 
४.    संगीत शिक्षक - मैट्रिक/एस.एस.सी. असलेल्या संगीत विशारद शिक्षकांसाठी संबंधित विषयातील पदवी व मैट्रिक/
       एस.एस.सी. उत्तीर्ण संगीत विशारद शिक्षकांसाठी संबंधित विषयातील पदव्युत्तर अर्हता प्राप्त करावी. 
५.    चित्रकला शिक्षक - डी.टी.सी. किंवा डी.एम.सी. किंवा ए.टी.डी. अशी अर्हता धारण करणार्यांनी आर्ट मास्टर प्रमाणपत्र
        अशी अर्हता धारण करावी. तसेच, जी.डी.आर्ट किंवा बी.एफ.ए.(पदवी) (रेखा व रंगकला/उपयोजित कला/शिल्पकला
        व प्रतिमान) अर्हता धारकांनी कला क्षेत्रातील आर्ट मास्टर प्रमाणपत्र/पदवीका (ए.एम.) किंवा कला शिक्षणशास्त्र 
      पदवीका (डी.एड.) अशी अर्हता धारण करावी.